⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘ग.स’ सोसायटीच्या मतदानासाठी १५ मतदान केंद्रांचे नियोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । २८ एप्रिल राेजी २१ जागांसाठी हाेणाऱ्या ग. स. साेसायटीच्या निवडणुकीसाठी, मतदानासाठी १५ मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात एक मतदान केंद्र असे निश्चित करण्यात आले आहे.

पाच पॅनलमधून ११६ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संताेष बिडवई यांनी १५ मतदान केंद्र जाहीर केले आहेत. त्यात अमळनेर येथे साने गुरूजी विद्यालय, बाेदवडला ना. ह. रांका हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज, भडगाव येथे सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व साै जयश्री पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ म्युनिसिपल हायस्कूल, चाळीसगाव येथे स्टेशन राेडवरील राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय, चाेपडा येथे म. गां. शिक्षण मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय, धरणगाव येथे पी. अार. हायस्कूल, एरंडाेल येथे अार. टी. काबरे विद्यालय, जामनेर येथे न्यू इंग्लिश स्कूल, मुक्ताईनगर येथे जगजीवनदास इंग्लिश स्कूल अँण्ड ज्युनिअर काॅलेज, पाचाेरा येथे गाे. से. हायस्कूल, पाराेळा येथे एन. ई. एस. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे नूतन मराठा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथे प. न. लुंकड कन्या शाळा, रावेर येथे जी. जी. हायस्कूल येथे मतदान होणार आहे.