जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील ेवैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंके यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भीरूड यांनी केले.यावेळी गोदावरी हेल्थ सिटी अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे गीत सादर करण्यात आले.

तसेच विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या २८ वर्षांच्या उल्लेखनीय वाटचालीचा आढावा घेण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाचा गौरव करत विद्यापीठाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा व संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करून करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.








