⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 12, 2024
Home | जळगाव जिल्हा | दुसऱ्या बसमधील ‘त्या’ ४३ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू ; आज रात्री ट्रेननं भुसावळात पोहोचणार

दुसऱ्या बसमधील ‘त्या’ ४३ प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू ; आज रात्री ट्रेननं भुसावळात पोहोचणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या ४३ प्रवासी असलेल्या एका बसचा नेपाळमध्ये भीषण अपघात झाला असून यात २७ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दुसऱ्या बसमधील ४५ भाविक प्रचंड घाबरले होते. यामुळे त्यांनी नेपाळमधून भारतात परतीचा प्रवास सुरू केला आहे. हे प्रवासी शनिवारी सायंकाळी ५ वाजता आँबुखैरी येथून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पोहोचले. तेथून रात्री १०.३० वाजता २०१०४ अप गोरखपूर एलटीटी एक्प्रेसला विशेष एसी डबा जोडून ते रविवारी रात्री ९ वाजता भुसावळात पोहोचतील.

शुक्रवारी झालेल्या भीषण अपघातानंतर दुसऱ्या लक्झरी बसमधील ४५ प्रवासी आँबुखैरी येथे पोहोचले होते. शुक्रवारी रात्री मुक्काम करून ते शनिवारी सकाळी पुन्हा भुसावळकडे परतीच्या प्रवासाला निघाले. शनिवारी सायंकाळपर्यंत गोरखपूर येथे पोहोचून तेथून रात्री १०.३० वाजता गोरखपूर एलटीटी गाडीला एक विशेष एसी कोच लावून त्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सूचना केली केली होती. दरम्यान, हे प्रवासी रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भुसावळ स्थानकावर पोहोचतील. तेथून वरणगाव व आपापल्या गावी जाणार आहेत.

आर्मीचे जवान सोबत, प्रवासात जेवण दिले : आँबुखैरी येथून गोरखपूरकडे निघालेल्या प्रवाशांच्या बससोबतच नेपाळ आर्मीचे जवान होते. दोन मिलिटरी वाहनांच्या बंदोबस्तात लक्झरी गोरखपूरला पोहोचली. सीमेवर भारतीय जवान सोबत होते. जवानांनी आम्हाला धीर दिला, अशी माहिती प्रमोद सरोदे यांनी दिली. तसेच आँबुखैरी येथून गोरखपूरकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसाठी उत्तर प्रदेश व नेपाळ सीमेवरील नौतनवा तालुक्यात तेथील प्रशासनाने जेवणाची व्यवस्था केली होती. अधिकाऱ्यांनी मदतीचा हात देत धीर दिल्याचे प्रवाशांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.