जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२५ । हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यातील या पिकांसाठी विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना जिल्हयात भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत मृग बहार सन २०२४ मध्ये पेरु, मोसंबी, लिंबू, सिताफळ व डाळीब या ५ पिकासाठी तर आंबिया बहार सन २०२४-२५ मध्ये आंबा, केळी, डाळिंब, पपई व मोसंबी या ५ पिकासाठी जिल्हयात हवामान धोक्यांच्या निकाषानुसार राबविण्यात येत आहे.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होणा-या शेतक-यांनी ई-पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतक-यांनी फळपिकाचा विमा घेतलेला आहे. परंतु फळपिकाची ई-पिक पाहणी डीजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅपव्दारे केलेली नाही. त्यांनी दिनांक २५ एप्रिल २०२५ पर्यंत ई-पिक पाहणी पूर्ण करावी. अन्यथा ७/१२ उता-यावर ई-पिक पाहणी नोंद नसलेले सर्व विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कुरबान मुराद तडवी यांनी दिली आहे.