गुरूवार, जून 8, 2023

येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढणार सोन्याचे भाव !

जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मे २०२३ : भारतीय रिझर्व्ह बँकेने २०००च्या नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही याला सकारात्मक तसेच नकारात्मक निर्णय म्हणत आहेत. मात्र जळगावच्या सुवर्ण नगरीवरसुद्धा याचा परिणाम झाला आहे.

नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलविण्याचा त्रास वाचवण्यासाठी नागरिक त्या दोन हजारांच्या नोटांचा सोन्यामध्ये खरेदी करून गुंतवणूक करत आहेत. दोन हजारांची नोटा बदलाव्या साठी लोकांचा सोने खरेदीवर वळतील, त्यामुळे परिणामी सोन्याचे भाव वाढतील,असं मत सराफ व्यवसायिकांनी बोलताना व्यक्त केलं आहे.

थोडासा त्रास होईल मात्र शासनाचा हा निर्णय निश्चितच चांगला असून यामुळे काळा पैसा बाहेर पडेल असेही सराफ व्यावसायिकांनी बोलताना सांगितलं.