जळगाव जिल्ह्यात श्रावणसरी बरसणार! १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान पावसाचा अंदाज

ऑगस्ट 14, 2026 1:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । श्रावणाच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील हवामानात मोठा बदल होत असून, पावसासाठी पुन्हा एकदा अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि मान्सून ट्रफ सक्रिय झाल्याने १४ ते १८ ऑगस्ट दरम्यान जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

rain

मागच्या काही दिवसापूर्वी जळगावमध्ये हलक्या पावसाच्या सरी बरसत आहे. आता श्रावण महिना सुरु झाला श्रावणाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. आज १४ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर १५ ऑगस्टला पावसाची काहीशी उघडीप राहणार असून, तुरळक ते हलका पाऊस पडू शकतो. त्यानंतर १६ आणि १७ ऑगस्ट रोजी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचा परिणाम

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राला अधिक बळ मिळाले आहे. त्यामुळे मान्सून ट्रफ सक्रिय झाला असून मध्य भारताकडे आर्द्रतायुक्त वारे खेचले जात आहेत. तसेच वायव्य मध्य प्रदेशावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

अरबी समुद्रातून येणारे बाष्प आणि बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली यांचा एकत्रित परिणाम उत्तर महाराष्ट्रातील पावसाला पोषक ठरणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आगामी दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचेही हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now