जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । शहरातील एका भागात अज्ञात भामट्यांनी घरात डल्ला मारून चक्क ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होता, अखेर त्या गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने जरबंद केले असून चक्क जावयांनीच सासऱ्याच्या घरात डल्ला मारून मुद्देमाल लंपास केल्याचे उघड झाले आहे.
तुषार विजय जाधव (पाटील) वय २५ रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव व त्याचा साथीदार २) सचिन कैलास चव्हाण वय २२ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव असे गुन्हेगारांचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिसांत सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपी विरूध्द दाखल होता, सदर गुन्हयात फिर्यादी यांचे राहते घराचे खालील गोडावून चे कडीकोंडा तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेले असुन ती चोरी त्याचा नातेवाईक जावाई तुषार विजय जाधव (पाटील) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव येथे राहणारा याने त्याचे साथीदारांसह केली आहे अशी गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली.
त्यानुसार पो. अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, विजय शामराव पाटील , अविनाश देवरे प्रीतम पाटील, दिपक शिंदे, राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्था. गु.शा, अशांना आदेश दिल्याने सापळा रचुन वरील आरोपीतास ताब्यात घेवुन त्याचे चार मित्र साथीदार यांना निषपण्ण करून त्यापैकी आरोपी १) तुषार विजय जाधव (पाटील) वय २५ रा. रामेश्वर कॉलनी दिनेश किराणा जवळ जळगाव व त्याचा साथीदार २) सचिन कैलास चव्हाण वय २२ रा. रामेश्वर कॉलनी जळगांव अशांना गुन्हयाकामी ताब्यात घेवुन सखोल विचारपुस करून गुन्हा उघडकीस आणला आहे.