⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | गुन्हे | Raver : घरफोडी आरोपींच्या अवघ्या काही तासात आवळल्या मुसक्या ; चोरीतील मुद्देमाल जप्त

Raver : घरफोडी आरोपींच्या अवघ्या काही तासात आवळल्या मुसक्या ; चोरीतील मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२४ । रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरमधील प्रवीण सीताराम महाजन यांच्या कुलूपबंद घरातून २२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. याबाबत पोलिस पथकाने शहरालगतच्या सावदा रोडवरील गैबनशहा बाबा दर्गाहच्या टेकडीखाली मोटारसायकलसह घरफोडीचे साहित्य बाळगणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली. ही कारवाई गुन्हा समोर आल्यावर सात तासांच्या आत करण्यात आली.

शहरातील एका गॅस एजन्सीत खासगी नोकरी करणारे प्रवीण सीताराम महाजन हे ५ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता शहरातील श्रीकृष्ण नगरमधील आपले घर कुलूपबंद करून त्यांच्या कुसुंबा बु॥ येथील मूळ गावी गेले होते. दरम्यान, त्यांच्या अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सात हजार रुपये रोख व चांदीच्या पाटल्या, पैंजण व जोडवे तथा सोन्याचे दोन ग्रॅम मणी असा २२,५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. ६ रोजी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली होती. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, फैजपूर सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या आदेशानुसार रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी फौजदार तुषार पाटील व फौजदार जगदीश तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पो.कॉ सचिन घुगे, पोकों सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे, प्रमोद पाटील यांच्या पथकाद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजसह शहराच्या सभोवती तपासाची चक्र गतिमान केली. आरोपीचा शोध घेत असतांना रावेर ते सावदा रोडवर असलेले एस.एस. बिंबेच्या पेट्रोल पंपाजवळ गैबानशहा बाबाचे दर्गाहच्या टेकडी खाली संशयित गोलूसिंग नसीबसिंग पटवा (वय २०, रा. पाचौरी, ता. खकनार, ह मु. ओझर वेडीपुरा मोहल्ला, ता राजपूर, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) व सुनीलसिंग कैलाससिंग बरनाल (वय २६, रा. गंदवाणी, ता. जि.धार मध्य प्रदेश) हे त्यांचे ताब्यात असलेल्या ७५ हजार रु. किमतीची विना नंबरप्लेटची मोटारसायकल तसेच घरफोडीचे साहित्य व ऐवज असा एकूण ७५ हजार ३६० चे आरोपींकडे आढळून आले. पोलिस पथकाने कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देत चोरीतील ३ हजार रु. किमतीचे ६ भार वजनाचे चांदीचे पैंजणांचा ऐवज काढून दिला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.