घरफोड्यातील सराईत गुन्हेगार अखेर जाळ्यात ; पोलिसांनी खाक्या दाखविताच दिली कबुली

जून 30, 2024 9:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२४ । घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने पाच महिन्यांपूर्वी अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात घरफोडी केल्याची कबुली दिली. किरण तुकाराम बारेला (सोलंकी) (२७, रा. दुदखेडा, सेंधवा, जि. बडवाणी, ह. मु. टाकळी प्र.दे., ता. चाळीसगाव) असे या संशयीत आरोपीचे नाव आहे.

crime 2 jpg webp

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या घरफोडीतील संशयित हा चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रवीण मांडोळे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील, पोहेकॉ कमलाकर बागुल, संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, पोकों ईश्वर पाटील, मोतीलाल चौधरी यांनी टाकळी प्र.दे. येथे जाऊन शिताफीने किरण बारेला याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता, त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. पथकाने त्याला खाक्या दाखविताच त्याने पाच महिन्यांपूर्वी सावखेडा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now