गुन्हे

भावाच्या अकाली मृत्यूनंतर छायाचित्रकाराने देखील घेतले विष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव येथील छायाचित्रकार रितेश बाळू पाटील याने आज विषारी प्राशन करून आत्महत्या केली. रितेश बाळू पाटील (वय २२) हा फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो जितका उत्कृष्ट छायाचित्रकार होता, तितकाच तो सर्व फोटोग्राफर्समध्ये लोकप्रिय देखील होता. अतिशय हसतमुख आणि इतरांच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या रितेशने आज विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याने परिसरासह तालुक्यातील फोटोग्राफर्सला जबर धक्का बसला आहे.

मनमिळावू आणि सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणार्‍या रितेशच्या या कृत्यामुळे त्याचे कुटुंब अक्षरश: उघड्यावर पडले आहे.अतिशय दुर्दैवी बाब म्हणजे रितेश पाटील याचे वडील आधीच वारले असून त्याच्या भावाचा देखील अपघाती अकाली मृत्यू झालेला आहे. आता त्याच्या पश्‍चात शेतमजुरी करणारी आई आणि दिव्यांग बहिण उरलेली आहे. रितेशने इतके टोकाचे पाऊल का उचलेले ? याची माहिती समोर आलेली नसली तरी यामुळे त्याचे कुटुंब मात्र उघड्यावर आलेय हे नक्की ! या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button