तरुणीचे अश्लील फोटो अपलोड करणाऱ्यास अटक

जुलै 29, 2022 9:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । साेशल मीडियावर बनावट अकाउंंट तयार करून तरुणीचे अश्लील फाेटाे अपलाेड करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पाेलिसांनी अटक करून वर्धा पाेलिसांच्या ताब्यात दिले. मुकेश राेहिदास झाल्टे (वय २२, रा. रामेश्वर काॅलनी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर वर्धा शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

jalgaon crime 1 5

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्र्कांत गवळी, सहा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली व एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक प्रतापसिंग कारे यांना मिळालेल्या माहितीवरून पाेलिसांनी मुकेशला गुरुवारी घरातून अटक केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now