⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | एरंडोलला पोळा सणाच्या माध्यमातून बैलांच्या झुलीवर शेतकऱ्यांच्या वेदना!

एरंडोलला पोळा सणाच्या माध्यमातून बैलांच्या झुलीवर शेतकऱ्यांच्या वेदना!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२२ । महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास महिन्याभरापासून ‘५० खोके एकदम ओके’ हे शब्द जोरदार चर्चेत आहेत. मात्र, दुसरीकडे महागाईने त्रस्त झालेला शेतकरी आपली व्यथा व महागाईची कथा सांगून काय उपयोग होणार असा सूर शेतकऱ्यांच्या गोठातून व्यक्त होत आहे. तथापि पोळा या सणाच्या दिवशी येथे प्रल्हाद पितांबर महाजन या युवा शेतकऱ्याने महागाई व शेती संबंधित घोषवाक्ये बैलांच्या अंगावर टाकलेल्या झुलीवर व्यक्त केली आहेत. आपल्या भावना व वेदना मुक प्राण्यांच्या अंगावर टाकलेल्या झुलीद्वारे बोलक्या ठरत आहेत.

एरंडोल येथे विखरण रस्त्यालगत राहणारे तरुण शेतकरी प्रल्हाद पितांबर महाजन हे गेल्या काही वर्षांपासून पोळ्याच्या दिवशी अनोखा उपक्रम राबवून जनप्रबोधन करीत आहेत. यंदा त्यांनी खते बियाणे महाग पेट्रोल डिझेल गॅस महाग शेतीमालाला हमीभाव द्या, नैसर्गिक आपत्तीतून मला वाचवा यासारखी घोषवाक्य झुलींवर लिहून त्या झुली बैलांच्या अंगावर टाकून गावात बैलांची मिरवणूक काढली. अशा प्रकारे जनजागृती व शेतकऱ्यांचे प्रबोधन या उपक्रमाद्वारे करण्यात आले, त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरावरून स्वागत करण्यात आले. दरम्यान काय ती आयडिया काय ती घोषवाक्ये आणि काय तो पोळा अशी चर्चा शहरात रंगत आहे

author avatar
टीम जळगाव लाईव्ह