जळगाव जिल्ह्यात लाचखोरी थांबेना ! एरंडोलचा पोलीस कर्मचारी एलसीबीच्या जाळ्यात अडकला

ऑक्टोबर 17, 2025 11:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत असताना, आता एरंडोल पोलिसाला तीन हजाराची लाच स्वीकारताना धुळे एलसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. बापू लोटन पाटील असं लाचखोर पोलिसाचं नाव असून या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

बापू पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. आणि ते नुकतेच जळगावहून एरंडोलला बदलून आले होते. एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातात जप्त केलेली दुचाकी परत करण्यासाठी हवालदार पाटील यांनी म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.

वास्तविक तक्रारदार स्वतः अपघातात गंभीर जखमी झाले होते. तडजोडीअंती तीन हजार रूपये देण्याचे ठरल्यानंतर हवालदार बापू पाटील यांनी तक्रारदाराला महामार्गावरील एरंडोल चौफुलीवर पैसे देण्यासाठी भ्रमणध्वनीवरून येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पाटील यांनी तक्रारदाराकडून तीन हजार रूपयांची लाच स्वीकारताच धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुरूवारी रात्री उशिपर्यंत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now