⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

मोटारसायकल चोरट्याच्या तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सोशल सायन्सच्या पार्कींगमधून मोटारसायकलची चोरी करणार्‍या चोरट्याच्या पाळधी दूरक्षेत्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान आरोपी खेमचंद तुकाराम पाटील याला अटक करून मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.


कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सोशल सायन्स विभागाच्या पार्कींगमधून दि. ३० रोजी होंडा शाइन कंपनीची मोटारसायकल क्र. एमएच -१९ एयु – २५०० ही अज्ञात दुचाकी चोरट्याने दुपारी १.३० वाजेच्या सुमारास चोरून नेली होती. याप्रकरणी गोपीचंद सोरडे यांनी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाळधी दूरक्षेत्र पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोहेकॉ विजय चौधरी, मोती पवार यांनी तपासचक्रे ङ्गिरवून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी खेमचंद तुकाराम पाटील (वय २९, रा. सोनवद बु. ता. धरणगाव) याला अटक करून त्याच्याकडून मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पोनि राहुल खताळ, सहा. पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय चौधरी, पोहेकॉ संजय महाजन, पोकॉ ज्ञानेश्‍वर बाविस्कर, पोकॉ जितेश नाईक हे करीत आहेत.