शाळेसमोरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

सप्टेंबर 10, 2021 7:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील राष्ट्रीय विद्यालयासमोरू अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime (1)

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. चाळीसगाव शहरातील राष्ट्रीय विद्यालयासमोर मुलगी ९ सप्टेंबर रेाजी दुपारी १ वाजता कामानिमित्त आली होती. दुपारी १ ते २.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने मुलीचे फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली आहे.

याप्रकरणी नातेवाईकांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरेाधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ढिकले करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now