जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२२ । जळगाव तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. हा प्रकार मंगळवारी उघडकीस आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते बुधवार ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता या दरम्यान मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा नातेवाईकांसह मैत्रिणींकडे शोधाशोध केली. परंतु ती कुठेही आढळून आली नाही.

याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता अल्पवयीन मुलीचे वडील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.
हे देखील वाचा :
- गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये गणेशोत्सव स्पर्धांतून संस्कृतीचा जागर
- सराफा बाजारात शनिवारी मोठी तेजी! सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ?
- जळगाव रेल्वे स्थानकावरील कामाचा फटका; १२ गाड्या रद्द, अनेकांच्या वेळेत बदल
- मुंबईत लालबागच्या दर्शनासाठी गेलेल्या जळगावच्या तरुण अभियंत्याचा मृत्यू
- बांभोरी पुलावरून महिलेने घेतली गिरणा नदीत उडी; शोधमोहीम सुरू !










