जळगावच्या अल्पवयीन मुलीला पळविले!

ऑगस्ट 31, 2022 1:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । शहरातील एका भागात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीला कुणी तरी अज्ञाताने पळवून नेल्याची घटना घडली आहे. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांत अल्पवयीन मुलीला नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon crime 6 jpg webp

जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होती. तिला दि.२९ रोजी रात्री ८.०० वाजेच्या सुमारास कुणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तिचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला कुणी तरी अज्ञात व्यक्तीने पळवून किंवा ती कुठे तरी निघून गेली असल्याचा संशयावरून पीडित मुलीच्या वडिलांनी रामानंदनगर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

दरम्यान, पीडित मुलीच्या वडीलानी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्व अल्पवयीन मुलीला नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोपाळ देशमुख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now