महाराष्ट्रराजकारण

बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासनाची महापौरांनी बोलवली बैठक !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । जळगाव शहरात विविध रस्त्यांचे काम सुरू आहेत. याचबरोबर शंभर कोटीतून होणाऱ्या पीडब्ल्यूडीच्या रस्त्यांची कामं लवकरच सुरू होणार आहेत. गेल्या वर्षी ३८ कोटीं मधील काही रस्त्यांची कामे झाली होती. या सगळ्या रस्त्यांच्या नियोजनाच्या अभावी जळगाव शहरातले कोणते रस्ते नक्की कोणत्या निधी अंतर्गत सुरू आहेत? याचा ठाव ठिकाणा हा जळगाव शहरातील नगरसेवकांना नसल्यामुळे आणि नागरिकांना नसल्यामुळे शहरामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या प्रकारची लक्षवेधी नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये मांडली होती.

जळगाव शहर महानगरपालिका ही स्वायत्त संस्था असून देखील तिच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांची काम हे बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यामुळे दोघांमधील होत नसलेल्या समन्वयामुळे कित्येक कामे रखडली आहेत. याआधी जळगाव शहराला १०० पैकी 38 कोटींचा निधी मिळाला होता. मात्र इतर निघीचे काय झाले? तो निधी परत गेला का? अशा प्रकारचा प्रश्नही यावेळी लक्षवेधीमध्ये नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मांडला होता.

याच अनुषंगाने बांधकाम विभाग आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय व्हावा यासाठी जळगाव शहर महानगरपालिका आणि बांधकाम विभागाची बैठक महापौर जयश्री महाजन यांनी घेण्याचे ठरविले आहे. या बैठकीमध्ये नितीन लढ्ढा यांनी मांडलेल्या लक्षवेधीनुसार चर्चा होणार असून या कामांचा मार्ग कसा मोकळा होईल? आणि बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन यामध्ये नक्की कशाप्रकारे समन्वय होईल? यासाठी ही बैठक घेण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या 17 व्या मायावर ही बैठक घेण्यात येणार आहे.

Related Articles

Back to top button