जळगावात बावनकुळेंचे स्वागत करण्यासाठी भाजप सज्ज !

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२३ । भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा संघटनात्मक दौरा सुरू झाला आहे. जळगाव येथे मंगळवार दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचा संघटनात्मक दौरा करणार आहेत.

ते दिवस भर पक्षाच्या मेळावा व बैठका उपस्थित राहुन आगामी रणनीती ठरवण्यात येणार आहे त्याच्या बरोबर गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, खा उन्मेश पाटील,खा रक्षा खडसे, महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, आ संजय सावकारे, आ मंगेश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, स्मिता वाघ व पदाधिकारी हि उपस्थित राहणार आहेत.

सर्वप्रथम सकाळी १०:३०ते ११:३० वृत्तपत्र माध्यम , विभाग प्रतिनिधि यांच्या बरोबर चहापान व चर्चा. ११:३० ते १२ युवा मोर्चा तर्फे भव्य बाईक रॅली. भा ज प कार्यालय येथून सुरवात होईल सुभाष चौक चित्रा चौक मार्गे छत्रपति शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप. दुपारी १२ ते १:३० छत्रपति संभाजी महाराज नाट्यगृह येथे जळगाव ग्रामीण व शहर महानगर चा शक्ति केंद्र बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा. १:३०ते २:१५ शोशल मिडिया बैठक छ .संभाजी ना गृह येथेच दुपारी ३:४५ ते ४:१५ धन्यवाद मोदीजी लाभार्थी कार्यक्रम. तेली मंगल कार्यालय दुपारी ४:१५ ते ५:१५ सामाजिक बैठक. वासुदेव गोंधळी समाज गृह जोशी कॉलनी तसेच माळी समाज बैठक. दापोरे मंगल कार्यालय होईल नंतर ५:१५ ते ५:४५ बुथ कमेटी बैठक. व युवा वाॅरीयस शाखाउद्घाटन सोहळा हनुमान मंदिर अयोध्या नगर संध्याकाळी. ५ :४५ ते ६:४५ जिल्हा व महानगर कोरकमेटी बैठक होणार असून असा दिवसभर संघटनात्मक दौऱ्यात विविध विषयांवर चर्चा करण्यात येनार तरी या बैठककिला जळगाव जिल्ह्यातील व महानगरातील प्रदेश पदाधिकारी , सदस्य जिल्हा व महानगर जिल्हा परिषद, पंचायत व बाजार समिती सदस्य सर्व नगरसेवक युवा मोर्चा व महिला आघाडी तसेच मंडल अध्यक्ष व विविध आघाडी,अध्यक्ष पदाधिकारी शक्ति केंद्र बुथ प्रमुख व कार्यकर्ते यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण सरचिटणीस सचिन पानपाटील मधु आबा काटे महानगराचे विशाल त्रिपाठी डॉ राधेश्याम चौधरी प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांनी केले आहे