जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील एन.सेक्टरमधील पद्मिनी एंटरप्रायजेसनजीकच्या फौजी ढाब्यासमोरील घरातून 9 जून रोजी दोन मोबाईलसह 29 हजारांची रोकड चोरीला गेली होती.
गुन्हे शाखेने गुन्ह्याची उकल करीत हा गुन्हा एन.सेक्टरमधे हमाली काम करणारा विनोद राठोड याने केल्याचे निष्पन्न केल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली.
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदीप सावळे, विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, सचिन महाजन, ईश्वर पाटील यांनी गुन्ह्याची उकली.