⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यात वैशाली सुर्यवंशी आयोजित मंगळागौर स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

पाचोऱ्यात वैशाली सुर्यवंशी आयोजित मंगळागौर स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२३ । पाचोरा शहराच्या मध्यभागी स्वर्गीय तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या निवासस्थाना जवळील शिवतीर्थ मैदान, जय किसान कॉलनी भडगाव रोड येथे वैशाली सुर्यवंशी, मीनाक्षी निकम सामाजिक कार्यकर्त्या (स्वयमदीप फाउंडेशनच्या निर्मात्या) कमलताई पाटील, महानंदा, योजना पुष्पाताई परदेशी तिलोंत्तमा मौर्य यांच्या उपस्थितीत मंगळागौर 2023 या कार्यक्रमाच्या पहिला दिवसाच्या स्पर्धा आणि सन्मान सोहळा संपन्न झाला.

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नवरत्न महिलांचा सन्मान करण्यात आला यात माधुरी नितीन कुमावत भातखंडे,ललिता सुनील पाटील जारगाव, ज्योती निलेश चौधरी पाचोरा, शारदा गोकुळ भावसार पाचोरा, फराना आसिफ शेख पाचोरा, सौ. रत्ना पतींगराव पाटील वडजी, मनीषा भाऊसाहेब पाटील आडळसे,सौ. शोभा अनिल पाटील बोदडे, अर्चना राहुल देशपांडे भडगाव होते.

स्पर्धांमध्ये मराठी वेशभूषा स्पर्धा उखाणे स्पर्धा (थीम/शब्द), सासु सुनेची फुगडी, प्रश्नमंजुषा आदींचा समावेश होता प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये त्वरित पुरस्कार देण्यात आले मराठी वेशभूषा मध्ये महिलांनी विविध प्रकारचे संदेश देत स्पर्धा पार पाडली आणि उखाणे व फुगडीच्या स्पर्धा आपण खूप रंगल्या होत्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून झाली कार्यक्रमात सौ. वैशालीताई सूर्यवंशी आपले विचार मांडताना म्हणाल्या की, महिला वर्ग सक्षम आहे त्यांनी स्वतःला कमजोर समजू नये. महिला प्रत्येक परिस्थितीवर मात करू शकते. तात्यासाहेब अचानक गेल्यावर माझ्यावर खूप दु:ख कोसळले होते, पण मी स्वतःला सांभाळलं आणि विचारांची, तत्त्वांची जोपासना करण्यासाठी, त्यांचा निष्ठेचा वारसा, त्यांचा व्यवसाय व शैक्षणिक वारसा त्यांच्या सामाजिक आणि राजकीय व विचारांचा वारसा जर व्यवस्थित सांभाळला तर माझे वडील माझ्या रूपाने समाजात फिरत आहे असं मला वाटेल आणि यासाठी मी राजकारणात उतरलेली आहे.

सध्याच्या काळात राजकीय परिस्थिती ठिक नाही आणि भरपूर प्रश्न उपस्थित आहे समाजात महिलांच्या सुरक्षेवर एक मोठा प्रश्नचिन्ह लागलेला आहे. मी तुमच्या पाठीशी कायम उभी आहे अशा प्रकारे ताईंनी आपले विचार मांडले. माननीय मीनाक्षीताई म्हणाल्या की महिलांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये काम करताना जर तुमचे पाय दुखत असतील तर हे विचार करा की समाजात काही असे पण लोक आहे की ते अपंग आहे त्यांना पायच नाहीत. देवाने आपल्याला पाय दिले आहे थोडे दुखतील, बोलताना त्रास होत असेल तर मूक महिला पण आहे आणि त्या व्यवस्थित जगत आहे आपली परिस्थिती सांभाळून घ्या वैशालीताई यांनी खूप चांगले कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या म्हणाल्या की ताई तुम्ही आदी शक्तीचे रूप आहात. तुमच्याकडे लोकं खूप आशेने बघत आहे. या कार्यक्रमात पाचोरा आणि भडगाव मतदार संघाच्या अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमांमध्ये खूप आनंद लुटला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.