
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । सावदा येथील नागरिकांची पाणी व घर पट्टी कर जास्तीची आकारणी करण्यात आली आहे त्यामुळे यात सवलत मिळावी. अशी मागणी येथील नागरिकांनी पालिकेच्या कर निरक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, रावेर तालुक्यातील सावदा येथे गेल्या दोन वर्षांपासून शहराची हद्दवाढ झाल्याने संपूर्ण नवीन भाग पालिका हद्दीत समाविष्ट आहे. या भागात रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट सुविधा नाही तर परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य आहे. तसेच पाणी व घर पट्टी जास्तीची आकारणी करून तश्या कर पावत्या येथील रहिवाश्याना देण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकांच्या मनात पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र चीड निर्माण झालेली आहे. याबाबत २८ रोजी नगरसेवक फिरोज खान पठाण व अपक्ष नगरसेवक अल्लाबक्ष उर्फ गुड्डू शेठ यांच्या नेतृत्वाखाली सर्व त्रस्त नागरिकांनी आप करण्यात आलेले जास्तीचे पाणी व घरपट्टी असे जुलमी कर कमी होऊन मिळावे अशी मागणी सावदा पालिकेचे प्रशासकीय अधिकारी व मुख्य अधिकारी यांच्या अनुपस्थितीमध्ये पालिकेचे कर निरक्षक अनिल कुमार अहुजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकबर खान, अमानुल्ला खान, शेख हुसनोद्दीन, शेख रफिउद्दीन, अश्फाक खान, इस्माइल खान, कादीर गुलाब खाटीक, शेख कमालुद्दीन हुसनोद्दीन यांच्यासह १२० रहिवाशांच्या सह्या आहे.
हे देखील वाचा :
- BHR ठेवीदारांच्या पैशांसाठी आमदार राजूमामा भोळे मैदानात; सहकारमंत्र्यांसमोर मांडल्या व्यथा
- जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचा दबदबा; २१ पैकी ‘इतक्या’ जागा बिनविरोध?
- गोदावरी अभियांत्रिकीच्या सुदीक्षा राजपूतची सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड
- गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
- जळगाव जिल्हा बँकेत मंत्री गुलाबराव पाटील बिनविरोध! तिघांची माघार





