जळगाव । जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील गणेश नगर येथे राहणाऱ्या ऐंशी वर्षीय वयोवृध्द दांपत्याला दंडूकेशाहीचा अवलंब करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राहत्या घरातून ओढून काढत घर मोडल्याचा गंभीर प्रकार घडला.

गेल्या बावन्न वर्षांपासून पिडीत दाम्पत्य या ठिकाणी वास्तव्यास असून महापालिकेच्या विधीविभागातील अधिकारी मनोज शर्मा यांच्या घरा शेजारीच त्यांचे झोपडे असल्याने त्यांच्याच सांगण्यावरुन हा सर्व उपद्व्याप घडवून आणल्याची तक्रार पिडीत सुतार दाम्पत्यातर्फे करण्यात आली आहे.
शर्मा यांनीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथक बोलावून घेतले. त्यानंतर या दाम्पत्याला राहत्या घरातून हात धरुन मनपा कर्मचाऱ्यांनी फरफटत बाहेर ओढून काढले. आधीच मोडकडीस आलेले घर अतिक्रमण विभागाने मोडून मरणाला टेकेलेल्या वयोवृद्ध दाम्पत्यास बेघर केले आहे.