चिमुकल्यांनी अनुभवला पदवीग्रहण सोहळा ; डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल सावद्याचा उपक्रम
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२४ । पदवीग्रहण सोहळा म्हटले की महाविद्यालयीन तरूण तरूणी डोळयासमोर येतात. पण सावद्याच्या पालक व चिमुकल्यांनी पदवीग्रहण सोहळा नुकताच अनुभवला.निमीत्त होते डॉ. उल्हास पाटील.
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मेडियम स्कूल सावदा येथील सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान समारंभ प्री ग्रॅज्युएशन संमारभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने प्रमुख अतिथी शैलेंद्र दखने गटशिक्षणाधिकारी रावेर,शाळेच्या प्रिन्सीपल भारती महाजन हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये सुरु असलेले कृतियुक्त शिक्षण पद्धतीचे कौतुक केले.
मग नृत्य सादर करून चिमुकल्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रसंगी बालकांनी व पालकांनी शाळेविषयी भावना व्यक्त केल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भारती महाजन यांनी चिमुकल्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. अर्चना इंगळे व आभार प्रदर्शन श्री. स्वप्नील बेलोशे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते चिमुकल्यांना पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.