दुर्दैवी! पाचोऱ्यातील पोलिस जवानाचा छत्तीसगडमध्ये रस्ते अपघातात मृत्यू

डिसेंबर 3, 2024 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा तालुक्यातील गाळण येथील पोलिस जवान किशोर शिवाजी गायकवाड (वय ४५) यांचा छत्तीसगड येथे रस्ता ओलांडताना चारचाकी वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

kishor gaikwad

पाचोरा तालुक्यातील गाळण (विष्णुनगर) येथील रहिवासी किशोर गायकवाड यांना लहानपणापासूनच देशसेवा करण्याची आवड होती. कठीण परिश्रम करून किशोर गायकवाड हे सन २०११ मध्ये १४ बटालियन सीएएफ (आयआर) रायपूर येथे पोलिस दलात भरती झाले. गेल्या १५ वर्षांपासून ते धानोरा, जि. बलोड (छत्तीसगड) येथील पोलिस दलात कर्तव्य बजावत होते. १ डिसेंबर रोजी सायंकाळी किशोर गायकवाड हे पत्नी सोबत बाजार करण्यासाठी व शतपावली करण्यासाठी गेले होते. यावेळी रस्ता ओलांडताना एका चारचाकी वाहनाने किशोर गायकवाड यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

किशोर गायकवाड यांचा मृतदेह आज जळगाव येथे दाखल होणार असुन त्यांच्यावर शासकीय इतमामात गाळण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. किशोर गायकवाड यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, चार भाऊ असा परिवार आहे. अत्यंत शांत व मनमिळाऊ स्वभाव असलेल्या किशोर गायकवाड यांच्या अकस्मात मृत्यूने गाळण (विष्णुनगर) सह परिसरात शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now