⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव व जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार !

धरणगाव व जळगाव तालुक्यातील 51 गावं सौर दिव्यांनी लखलखणार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

10 कोटीचा निधी मंजूर : मंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑगस्ट २०२४ । ऑगस्ट जळगाव व धरणगाव तालुक्यातील 51 गावांमध्ये सौर पथ दिवे व हाय मास्ट बसविण्यासाठी 101 कामांकरिता तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेतर्गत शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत यावलचे एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासनास केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यातील 51 गावांमधील आदिवासी वस्त्यां सौर दिव्यांनी लखलखणार आहे. यामुळे आदिवासी बांधवांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहे.

पालकमंत्र्यांमुळे या योजनेची वाढली व्याप्ती
समाजातील दुर्लक्षित असलेल्या आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी त्यांचा हक्काचा आवाज बनून अनेक प्रश्न मांडले आहे. ज्या गावांमध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या 50 टक्के पेक्षा कमी आहे अशा ठिकाणी ठक्कर बाप्पा योजनेचा लाभ मिळत नव्हता. या योजनेचा संपूर्ण आदिवासी समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे ठक्कर बाप्पा योजनेची व्याप्ती वाढली आहे. या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णय क्र.ठबायो- 2021/प्र.क्र.15/का.9 दि. 3 फेब्रुवारी 2023 नुसार सुरू करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यामधील 38 गावांतील तसेच जळगाव तालुक्यातील पहिल्या टप्प्यात 13 गावांमध्ये एकूण 51 गावांमधील आदिवासी वस्त्यांमध्ये 101 सौर पथ दिवे व हाय मस्ट लॅम्प बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे. य मस्ट लंप बसविण्यासाठी तब्बल 10 कोटी 10 लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे आहेत निकष
3 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या – 1 कोटी, 1500 ते 3 हजार लोकसंख्या- 75 लाख, 1 हजार ते 1499 लोकसंख्या – 50 लाख, 500 ते 999 लोकसंख्या – 40 लाख, 101 ते 499 लोकसंख्या – 20 लाख, 1 ते 100 लोकसंख्या – 5 लाख या लोकसंख्येच्या अधीन राहून निधी मंजूर करण्यात येतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.