संतापजनक! मतिमंद असल्याचा फायदा घेत केला अत्याचार, पीडिती मुलगी गर्भवती

जुलै 7, 2023 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । पारोळा तालुक्यातून संतापजनक घटना समोर आलीय. मतिमंद असल्याचा फायदा एकाने तब्बल चार महिने मुलीवर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याची घटना प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत संशयित नराधम याच्याविरुद्ध बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

crime 4 jpg webp

याबाबत पीडितेच्या बहिणीने फिर्याद दिली आहे की, तिची बहीण मतिमंद आहे. याचा फायदा घेत संशयित नराधमाने दिनांक 1 जून ते 20 जून दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून तिला सतरा आठवड्यांची गर्भवती केल्याची फिर्याद पीडीतेच्या बहिणीने दिली.

याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवळकर करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now