मुलीच्या लग्नला नकार दिल्याने भावी नवरदेवाने चक्क..

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याचा राग येऊन दोघांनी मुलीला पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीला आलीय. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

crime 2022 06 20T165600.579 jpg webp

तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी घोडेगाव येथून विवाहासाठी स्थळ आला. सदर गोष्ट वर्षभर चालली. मात्र सदर स्थळ मुलीच्या वडिलाला आवडला नाही. म्हणून त्यांनी समोरच्या भावी वराला वारंवार नकार दिला. याचाच राग आल्याने भावी वरासह एकाने माझ्या मुलीला पळवून नेले असावे असा संशय घेत पीडितेच्या वडिलांनी,

चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्थानक गाठून संशयित आरोपी जगन परशराम राठोड व मनेश धनराज राठोड दोन्ही रा. घोडेगाव ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now