चाकू हल्ल्यातील फरार हल्लेखोराचे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ऑक्टोबर 8, 2023 1:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरातील सम्राट कॉलनी येथे जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करून अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ललित उमाकांत दीक्षित असे अटक केलेल्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

lalit dixit jpg webp

नेमकं प्रकरण काय?
२७ जुलै रोजी जुन्या वादातून सम्राट कॉलनीतील शुभम भगवान माळी यांच्यावर ललित उमाकांत दीक्षित याच्यासह दोन साथीदारांनी धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून ललित हा फरार होता. ललित याच्यावर यापूर्वी सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी तो पाळधी येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथक तयार करुन कारवाईच्या सूचना दिल्या. संशयित सायंकाळी पाळधी येथील एका हॉटेलमध्ये येताच त्याला पोउनि दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ किरण पाटील, सचिन पाटील, इमरान सय्यद, किशोर पाटील, गणेश शिरसाळे, सुधीर साळवे, योगेश बारी, साईनाथ मुंडे, राहुल रगडे, विशाल कोळी यांच्या पथकाने अटक केली. शनिवारी त्याला न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now