जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल येथून सुमारे ४ किलोमीटर अंतरावरील नंदगाव येथे दिलीप कथ्थू पाटील (वय ५७) या शेतकऱ्याने आज भल्या पहाटे घराच्या बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरी लावून गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली, मात्र आत्महत्या का केली या मागचे कारण अजून अस्पष्ट आहे.
ज्ञानेश्वर कथ्थू पाटील यांनी या घटनेबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एरंडोल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नंदगाव येथे मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिलीप पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुन नातु चार भाऊ असा परिवार आहे. दरम्यान दिलीप पाटील यांच्याकडे दोन बिघे शेती होती, याबाबत अनिल पाटील, जुबेर खाटीक, राजेश पाटील, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहे
नंदगावच्या शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
Published On: ऑक्टोबर 11, 2022 7:06 pm

---Advertisement---