
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ फेब्रुवारी २०२२ । गेल्या महिन्यात पार पडलेल्या बोदवड पालिकेच्या निवडणुकीत १७ पैकी ९ जागांसह बहुमत मिळवले आहे. आता १८ फेब्रुवारीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही धोका नको म्हणून शिवसेनेचे सर्व नगरसेवक सहलीवर रवाना झाले आहेत. दुसरीकडे ७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने तूर्त ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका ठेवली आहे.
बोदवड पालिकेत १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पालिकेत विशेष सभा होईल. पीठासीन अधिकारी प्रांत रामसिंग सुलाने असतील. या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे सर्व ९ नगरसेवक सहलीवर रवाना केले. त्यांच्यासोबत भाजप नगरसेवकाच्या मुलाची उपस्थिती असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तूर्त सईद बागवान व आनंदा पाटील या दोघांची नावे चर्चेत आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी १४ फेब्रुवारीला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज भरता येईल. नंतर छाननी होऊन वैध व अवैध उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील. १७ फेब्रुवारीला माघार घेता येईल. यानंतर १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता विशेष सभा होईल, त्यानंतर बोदवडला कुणाचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित होणार आहे.
हे देखील वाचा :
- यावल नगरपरिषदेत राजकीय भूकंप! काँग्रेस नगरसेवक अपात्र
- जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! पहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम..
- मंत्री गुलाबराव पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास; शामखेड्यात असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश
- उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
- काळ्याकुट्ट नकली भुवया.. MPSC आंदोलनावरून रोहिणी खडसेंची चित्रा वाघांवर जोरदार टीका





