धक्कादायक! चालकाच्या हातातून एसटी बसचे नियंत्रण सुटले, सुदैवाने मोठा अपघात टळला
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । भुसावळ तालुक्यातील जामनेर रस्त्यावरील चोरड नजीक सुशीला जिनिंग जवळ एसटी बसचा मोठा अपघात टळला. एसटी बस चालक अतिवेगाने वाहन चालवत होता, अचानक चालकाच्या हातातून एसटी बसचे नियंत्रण सुटले अन् बस थेट शेतात उतरली. एसटी बस चालकाच्या निष्काळजी पणामुळे हे सगळं घडलं असून यात प्रवाशच्या जिवाशी खेळ होत होता मोठा अपघात टळला आहे.
औरंगाबाद विभागाची बस क्रमाक (MH20BL3828) ही भुसावळ येथून औरंगाबादसाठी रवाना झाली होती. मात्र, भुसावळ तालुक्यातील जामनेर रस्त्यावरील चोरड नजीक सुशीला जिनिंग जवळ दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक चालकाच्या हातातून एसटी बसचे नियंत्रण सुटलेही एसटी बस थेट शेतात उतरली. विशेष म्हणजे, एसटी बस चालकाच्या निष्काळजी पणामुळे प्रवाशांच्या जिवाशी खेळ होत होता मोठा अपघात टळला असून प्रवाशांच्या जिवाला काही हानी झालेली नाहीय. दरम्यान, अशा चालंकावर एसटी महामंडळाने कारवाई करावी असे बोलले जात आहे.