डॉक्टरनेच केली महिलेला मारहाण : गुन्हा दाखल !
पाळधी गावात महिलेचा डॉक्टरनीच विनयभंग करीत अश्लील शिविगाळ केली तसेच कुटूंबाला ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना गुरुवार, 25 मे रोजी सकाळी 11.15 वाजता घडली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित डॉ.उत्पल कुंवर पाटील (पाळधी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाळधीतील 55 वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, गुरुवार, 25 मे रोजी सकाळी 11.15 वाजता संशयित तथा डॉ.उत्पल कुंवर पाटील हे दुचाकी लावत असताना पीडीत महिलेने वाळूजवळ दुचाकी लावत जावू नका, आमचे नुकसान होते, असे म्हटल्यानंतर डॉक्टरांनी वाद घालत महिलेला अश्लिल शिवीगाळ करून कानशिलात लगावली.
त्यानंतर महिला ही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असतांना तिचा रस्ता अडवून तिच्या अंगावरील साडी ओडून विनयभंग केला. आणि कुटुंबाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दरम्यान तीन ते चार दिवस महिलेने पोलिसात कुठलीही तक्रार दिली नाही, परंतु अखेर मोठ्या हिंमतीने मंगळवारी रात्री 9 वाजता महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर डॉक्टर उत्पल कुवर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोर करीत आहे.