जळगाव शहर

जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा मूजे महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा 2022 चे आयोजन दि.18 रोजी मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. त्याची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात असून या स्पर्धेत एकूण 744 पोस्टर व माॅडेलची नोंदणी झाली आहे. चार टप्प्यात घेण्यात येणारी ही स्पर्धा संशोधनाची आवड निर्माण व्हावी याकरिता राज्यपाल (कुलपती) यांच्या वतीने विद्यापीठ स्तरीय, राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत असते.

कृषी व पशुसंवर्धन (74), वाणिज्य व्यवस्थापन व विधी (49), अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (85), सामाजिक शास्त्र,भाषा, मानव्यविद्या, ललित कला (176), औषध निर्माण शास्त्र (87), विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, गणित, पर्यावरण शास्त्र, गृह आणि संगणक शास्त्र) (263) अशा एकूण 744 प्रवेशिका प्राप्त झालेल्या आहेत. या संशोधन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी शिक्षक यांच्या संशोधना ची अधिक माहिती घेण्याकरिता विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेला भेट द्यावी असे आव्हान प्राचार्य संजय भारंबे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button