जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । शहरातील वाघनगर येथील कोल्हे हिल्स परिसरात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे. या घटनेमुळे कोल्हे हील्स परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, वाघ नगर येथील कोल्हे हिल्स परिसरात मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अंदाजे २५ वर्षीय तरूणाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मयत तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून त्या मयत तरुणाने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमागे आणखी काही वेगळे कारण आहे का याचाही शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह रात्री ११ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलीसांनी केले आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास अनिल फेगडे हे करीत आहे.
हे देखील वाचा:
- या राशींचे आज नशीब सूर्यासारखे चमकेल, नवीन संधींची दारे उघणार; वाचा आजचे राशिभविष्य
- तूरचा भाव प्रति क्विंटल 5 हजारांनी घसरला; शेतकऱ्यांना मोठा फटका
- Jalgaon : शेतीतून उत्पन्न नाही, कर्जफेडीची चिंता, घरात कोणी नसताना शेतकऱ्याने उचललं धक्कादायक पाऊल
- वाल्मिक कराडवर अखेर मकोका; कोर्टात नेमकं काय झालं?
- मध्यमवर्गीयांसाठी ‘या’ आहेत पाच परफेक्ट कार; किंमतही बजेटच्या बाहेर जाणार नाही!