जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । पाचोरा शहरातील एका भागात आठ दिवसांपूर्वी १ लाख ७५ हजार रुपये घेऊन चौथा विवाह केल्यानंतर सासरच्या मंडळीना पाण्यात गुंगीचे औषध देऊन लोखंडी रॉडने पती, सासू व सासऱ्यास मारहाण केल्याची घटना येथे घडली हाेती. त्यात गंभीर जखमी झालेले सासरे अर्जुन पाटील यांचा उपचारादरम्यान हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी येथील पाेलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मारहाणीची ही घटना पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्लीत घडली होती. दरम्यान मारहाण करणारी सून अल्पवयीन असल्याने तिला जळगावच्या बाल सुधारगृहात पाठवले. तिच्या वडिलांची मात्र जामिनावर सुटका झाली आहे.