जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२२ । श्रीकृष्णाच्या जन्मभूमीच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद उभारण्यात आली असून ही मशीद हटवण्याची मागणी असणारी याचिका मथुरा जिल्हा न्यायालयाने रिव्हिजनसाठी दाखल करून घेतली आहे. श्रीकृष्णाचे भक्त असल्याचं सांगत वकील हरिशंकर जैन, विष्णूशंकर जैन आणि रंजना अग्निहोत्री यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल करून घेत त्यावर 19 मे रोजी सुनावणी ठेवली होती. मात्र, आता 1 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. यामुळे आता मुथुरेत काय होत ? हा पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.
जिल्हा न्यायालयाने याचिका दाखल करून घेतल्यानंतर आता या वादग्रस्त स्थळाच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीकृष्ण जन्मभूमीची 13.37 एकरची जागा मुक्त करून शाही ईदगाह मशीद हटवण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. वाराणासीतील ज्ञानवापी मशिदीचा सर्व्हे करण्यात आला होता. त्यामुळे मथुरेतही अशाच प्रकारचा सर्व्हे केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रंजना अग्निहोत्री या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. राम जन्मभूमी प्रकरणातही त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांनी श्रीकृष्ण जन्मस्थळाच्या 13.37 एकर जमिनीवर दावा केला आहे. ही जमीन श्रीकृष्ण जन्मस्थळाची आहे. पण त्यावर शाही ईदगाह निर्माण करण्यात आला आहे. असा त्यांचा दावा आहे.