जप्त केलेल्या वाहनांचा 18 रोजी यावलला लिलाव

ऑक्टोबर 14, 2021 12:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२१ । यावल तालुक्यातील अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करीत असतांना जप्त केलेल्या वाहन मालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसूल करण्यासाठी १८ ऑक्टोंबर, २०२१ रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, यावल येथे जप्त केलेल्या पाच वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

new 11 1

इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात असलेली वाहने, लिलावात हातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, यावल यांच्याशी संपर्क साधावा, असे तहसीलदार, यावल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now