लग्न समारंभासाठी आलेल्या कुटुंबाच्या कारचा झाला अपघात ; चौघे जखमी
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथे लग्न समारंभासाठी आलेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यावेळी कार उलटी फिरल्याने ४ जण जखमी झाले. हि घटना. सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास घडली.
पिळोदे येथील मूळ रहिवासी भगवान मोरे हे रत्नागिरी येथे केंद्रप्रमुख आहेत. ते नातेवाईकांच्या लग्न समारंभानिमित्त गावात आले होते. भगवान मोरे हे चारचाकी वाहनाने पत्नी, पुतणी व चुलत भाऊ असे धुळ्याला जात होते. या वेळी गांधली गावाच्या पुढे अचानक रस्त्याच्या बाजूच्या त्यांचे चारचाकी वाहन चारीत पलटी झाले. यात कारमधील भगवान मोरेसह सर्वचजण दाबले गेले.
त्यावेळी तेथून अविनाश पवार, बंटी बोरसे, जनार्दन कोळी, भूषण सूर्यवंशी यांच्यासह अन्य जण जात होते. त्यांना चारीच गाडी पलटी झाल्याचे पाहिले. त्यांनी कारच्या दिशेने तात्काळ धाव घेत गाडीमध्ये दबलेल्या सर्वांना बाहेरा काढून अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात एकाला गंभीर मुका मार बसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीसांत उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्यात आली नव्हती.