⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अनियंत्रित होऊन पुलाखाली कोसळली कार, पाच प्रवासी बचावले, कारचा कोळसा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२२ । चालकाचे नियंत्रण सुटल्याने एणगाव येथे कार पुलावरून खाली कोसळली. शनिवारी दुपारी १ वाजेच्या या दुर्घटनेत केवळ दैव बलवत्तर म्हणून पाचही प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढण्यात यश आले. नंतर केवळ दहा मिनिटात कारला आग लागून स्फोट देखील झाला. पाच प्रवाशांपैकी एक महिला मात्र गंभीर जखमी झाली आहे.

अधिक माहिती अशी की, सोयरीक संबंधासाठी संजय प्रभाकर तप (वय ५०) आणि भावी नवरदेव गोपाळ संजय तप (वय ३०) हे दोघे वडील व मुलगा शनिवारी सकाळी अहमदाबाद येथून मलकापूरला कारने आले. नंतर मलकापूर व मोताळा येथील तीन नातेवाईक महिला अनुक्रमे मंगला एकनाथ तप (वय ४५), वंदना संतोष काठोके (वय ३०) आणि आशा शामराव पाटील (वय ६५) यांना सोबत घेऊन ते सोनाटी (ता.बोदवड) येथे स्विफ्ट कारने निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास एणगाव येथील वीज उपकेंद्राजवळ असताना गोपाळ याचे कार वरून नियंत्रण सुटले. नंतर ही कार थेट पुलावरून खाली कोसळली. ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. कारच्या काचा फोडून आतील पाचही प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. दरम्यान, या दुर्घटनेत आशा पाटील ही महिला गंभीर जखमी झाली. पाचही प्रवाशांना बाहेर काढल्यानंतर काही मिनिटातच कारला आग लागून स्फोट झळा. त्यात संपूर्ण कार जळाली. जखमींवर एणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून मलकापूर येथे रवाना करण्यात आले. आरोग्य केंद्रातील डॉ.कपिल पवार व सहकाऱ्यांनी उपचार केले.