खड्ड्यामुळे कार आदळली झाडावर; वेळीच एअर बॅग उघडल्याने बचावले कुटुंबीय

नोव्हेंबर 29, 2021 3:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२१ । इंदौर येथून काम आटोपून चोपड्याकडे परतत असतांना रस्त्यात आलेल्या खड्ड्यामुळे गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळल्याची घटना रविवारी शिरपूर-चोपडा रस्त्यावरील काझीपुरा फाट्यानजीक घडली. धडक इतकी जबदस्त होती की यात कारचे चाक निखळून वेगळे झाले व एक्सल तुटून ड्रायव्हर साईडचे दोन्ही दरवाजे ब्लॉक झाले. सुदैवाने वेळीच एअर बॅग उघडल्याने डॉक्टर दाम्पत्यासह कारमधील तिघे जण बालंबाल बचावले.

accident jpg webp

चोपडा येथील जनसेवा हॉस्पिटलचे संचालक तथा आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला हे पत्नी डॉ. सोनाली बारेला, मुलगा राजे, भाचा व शालक आदींसह खासगी कामानिमित्त इंदौर येथे गेले होते. इंदौर येथून चोपड्याकडे परतत असताना शिरपूर-चोपडा रस्‍त्‍यावरील काझीपुरा फाट्याजवळ अचानक रस्त्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यात कारचे पुढचे चाक निखळून वेगळे होऊन लांब पडले तसेच गाडीचा एक्सल तुटून, ड्रायव्हर साईडचे दोनही दरवाजे ब्लॉक झाले होते.

अन रुग्णवाहिका पोहोचली घटनास्थळी
धडक होताच कारमधील चारही एअरबॅग उघडल्या यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. गाडीत असलेल्या ॲटो सिस्टिममुळे १०८ या क्रमांकावर फोन लागला. त्यामुळे रुग्णवाहिका देखील ताबडतोब घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत मात्र, नागरिकांनी डॉक्टर व कुटुंबियांना गाडीच्या बाहेर काढले होते. डॉ. सोनाली बारेला यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून, त्यांनी तातडीने प्राथमिक उपचार घेतले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now