जळगाव जिल्हाजळगाव शहर

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी दोन जणांचे उमेदवारी अर्ज वैध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ डिसेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेल्या व्यवस्थापन प्रतिनिधीमधून व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी दोन जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले आहे. महेश घुगरी (धुळे एज्युकेशन सोसायटी, धुळे) व माजी मंत्री सतीश पाटील (किसान विद्या प्रसारक संस्था, पारोळा) यांचा त्यामध्ये समावेश आहे.

बुधवारी कुणीही आक्षेप न नोदविल्यामुळे आता माघारीच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. व्यवस्थापन परिषदेवर निवडून द्यावयाच्या एका जागेसाठी छाननीअंती वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली असून, महेश घुगरी (धुळे एज्युकेशन सोसायटी, धुळे) व माजी मंत्री सतीश पाटील (किसान विद्या प्रसारक संस्था, पारोळा) यांचा त्यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, १ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंत कुलगुरूंकडे आक्षेप दाखल करावयाचा होता. मात्र, कुणीही आक्षेप न नोंदविल्यामुळे आता ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसाकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

कुलगुरू पदाच्या अर्जासाठी आज अंतिम मुदत

१ ) कार्यकाळ संपूण्यापूर्वी प्रा.पी.पी.पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदाच्या जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

२ ) अर्ज पाठविण्याची गुरुवार ही अंतिम मुदत असल्याची माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठीची निवड प्रक्रीया प्रारंभ आहे.

३ ) कुलगुरू पदासाठीची जाहीरात प्रसिध्द झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर २ डिसेंबरपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी अर्ज करण्याचा अंतिम दिवस असणार आहे.

 

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Related Articles

Back to top button