⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

यंदाच्या युवारंगसाठी नंदुरबारच्या हिरालाल‎ चौधरी महाविद्यालयाकडून प्रस्ताव‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर‎ महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आयोजित‎ केल्या जाणाऱ्या यंदाच्या युवारंग‎ महोत्सवासाठी नंदुरबारच्या‎ हिरालाल चौधरी महाविद्यालयाने‎ संयोजकत्व स्वीकारण्याचा प्रस्ताव‎ महाविद्यालयास दिला आहे.

अद्याप‎ हा एकमेव प्रस्ताव प्राप्त झाला आहे.‎ महोत्सवासाठी नियुक्त समिती या‎ ठिकाणी जावून पाहणी करणार‎ आहे. ओमायक्रॉन संसर्गजन्य‎ स्थितीत सुधारणा झाल्यास‎ फेब्रुवारीच्या पहिल्या,दुसऱ्या‎ आठवड्यात युवारंगचे नियोजन‎ शक्य आहे.‎ डिसेंबर अखेरपर्यंत यंदा‎ कोणत्याही महाविद्यालयांमध्ये‎ स्नेहसंमेलनाचे आयोजन, तयारी‎ सुरु नसल्याचे चित्र दिसत आहे.‎ ‎विद्यापीठातर्फे दरवर्षी होणारा‎ युवारंग महोत्सव गेल्या वर्षीप्रमाणे‎ यावर्षीही होईल की नाही, याबाबत‎ महाविद्यालयीन तरूणाईमध्ये‎ तर्कवितर्क सुरु आहे. युवारंगच्या‎ आयोजनाबाबत विद्यापीठाकडून‎ महाविद्यालयांना संयोजकत्वाचे पत्र‎ पाठवूनही कोणत्याही‎ महाविद्यालयाने त्यास तयारी‎ दर्शवली नव्हती; मात्र नंदुरबार‎ येथील हिरालाल चौधरी‎ विनाअनुदानित महाविद्यालयाने‎ युवारंग महोत्सवाचे संयोजकत्व‎ स्वीकारण्याची तयारी दर्शवली‎ आहे. त्यानुसार युवारंग नियोजन‎ समिती पुढील आठवड्यात या‎ महाविद्यालयाची पाहणी करणार‎ आहे. यात विद्यार्थांच्या निवासाची,‎ भोजनाची व्यवस्था, रंगमंच, प्रशस्त‎ हॉल याची पाहणी करून अंतिम‎ निर्णय घेण्यात येईल.‎

फेब्रुवारीत महाेत्सव‎ हाेण्याची शक्यता : सद्या हिवाळी परीक्षा सुरु आहेत,‎ जानेवारीच्या मध्यंतरापर्यत त्या‎ सुरु राहतील. या काळात‎ महोत्सवाचे आयोजन करता‎ येणे शक्य नाही. परीक्षा‎ आटोपल्यानंतर याचे नियोजन‎ करण्याचे प्रयत्न सुरु आहे.‎ त्यामुळे महोत्सवासाठी जागेची‎ निश्चिती झाल्यानंतरही‎ महाविद्यालयातील विद्यार्थांना‎ सराव करण्यासाठी काही‎ दिवसांचा अवधी द्यावा लागणार‎ आहे. त्यामुळे महोत्सवाचे‎ आयोजन फेब्रुवारीच्या मधल्या‎ आठवड्यात शक्य असल्याचेही‎ विद्यापीठाच्या विश्वसनीय‎ सूत्राने सांगितले.

हे देखील वाचा :