⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील 200 विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२४ । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात कॅडेव्हरीक ओथ अर्थात शवविच्छेदनापूर्वीची शपथ घेण्यात आली. यावेळी 200 विद्यार्थ्यांनी ही शपथ ग्रहण केली.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना डॉ. पूनम यांनी शवविच्छेदनापूर्वीची शपथ दिली. यावेळी 200 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्येक 10 विद्यार्थ्यांसाठी एक शव अभ्यासासाठी उपलब्ध करून दिले जाते. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना अशी सुविधा उपलब्ध करून देणारे हे एकमेव महाविद्यालय आहे. यावेळी विभागप्रमुख डॉ. अमृत महाजन, डॉ. शुभांगी घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. तुषार पाटील, डॉ. जमीर, डॉ. पूनम, डॉ. प्रिती साळुंके, डॉ. रघुराज यादव यांच्यासह कर्मचारी गजानन जाधव, गोपाल नांदुरकर, रोशन महाजन, राजू धांडे, गुणवंत कोल्हे आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.