गिरणा नदीत बुडालेल्या तरुणाचा तिसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

डिसेंबर 21, 2023 1:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२३ । गिरणा नदी पात्रात बुडालेल्या तरुणाचा तिसऱ्या दिवशी मृतदेह सापडला. मंगल इघन बाविस्कर (वय- ३२, रा. बोरनार, ता. जळगाव)असे मयत तरुणाचे नाव असून याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली

budun mrutue jpg webp

नेमकी घटना काय?
जळगाव तालुक्यातील बोरनार येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेला मंगल बाविस्कर मजुरी काम करून आपला प्रपंच भागवत होता. सोमवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी तो कामावर गेला होता. सध्या गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गिरणा नदीला चांगलेच पाणी आलेले आहे. संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मंगल घरी परतत असताना त्याला नदीपात्रात पाण्याचा अंदाज आला नाही व तो पाण्यात बुडाला.

ही घटना लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. तसेच काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनाही बोलविले. अखेर बुधवारी २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता त्याचा मृतदेह सापडला. तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now