जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली एका २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शुभम नंदू माळी (वय-२०) रा. दत्तनगर बोदवड असे मयत तरूणाचे नाव असल्याचे ओळख पटली असून तरूणाचा घातपात झाला असावा असा संशय नातेवाईकांकडून केला आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे घटना?
जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती बोदवड पोलीसांना मिळाली. पोलीसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता शुभम नंदू माळी (वय-२०) रा. दत्तनगर बोदवड असे मयत तरूणाचे नाव असल्याचे ओळख पटली. ही घटनेची माहिती मिळताच शुभमची आई व नातेवाईकांनी धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून एक आक्रोश केला होता.

घातपात झाल्याचा संशय?
शुभमचा घातपात झाल्याचा संशय आई व नातेवाईकांनी केला आहे. शुभम नंदू माळी हा तरुण बदलीवर पालेभाज्या घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर जात असायचा अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम यांनी दिलेल्या खबरी वरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
हे देखील वाचा :
- भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत
- भुसावळातील माजी सैनिकाची १० लाखांची फसवणूक; सायबर ठगांनी असा लावला चुना?
- पंढरपूर वारीवरून परतणाऱ्या यावल तालुक्यातील भाविक महिलेचा एसटीच्या धडकेत मृत्यू
- वरणगाव पोलिसांची धडक कारवाई! महामार्गावर ५.१७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एक जण अटकेत
- धरणगाव-जळगाव मार्गावर भीषण तिहेरी अपघातात ८ जण गंभीर जखमी











