माणुसकी समूहाने तक्रार दाखल करताच एका तासात लागले फलक
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । शहरातील महात्मा फुले मार्केट येथे मोफत असणाऱ्या मुतारी मध्ये लघवीसाठी जाणाऱ्या पुरुष व महिलांकडून २ रु सक्तीने वसुल करण्यात येत होते. याबाबत माणुसकी समूहाने तक्रार दाखल करताच चक्क एका तासात फलक लागले.
महात्मा फुले मार्केट हे कपडासाठी प्रसिद्ध आहे. येथे जीवनावश्यक वस्तू पासून तर संसार उपयोगी सर्व साहित्य या ठिकाणी मिळतात त्यामुळे हा परिसर सतत गर्दीने हा गजबजलेला असतो. काल माणुसकी रुग्णसेवा समूहाचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन पाटील हे कपडे खरेदी करण्यासाठी महात्मा फुले मार्केटमध्ये गेले असतांना फुले मार्केट येथे मोफत असणाऱ्या मुतारी मध्ये लघवीसाठी जाणाऱ्या पुरुष व महिलांकडून २ रु सक्तीने वसुल करण्यात येत होते. व सुट्टे पैसे नसेल तर आत जाण्यास मज्जाव केला जात होता. त्या ठिकाणी संडास व अंघोळीसाठी किती शुल्क आकारले जाते याचा कोणताही फलक नव्हता.
हि बाब चेतन पाटील यांच्या लक्षात येताच माणुसकी समुहाच्या टीमने जळगाव महानगर पालिका महापौर सेवा कक्ष येथे संपर्क करून तक्रार दाखल केली. व त्याची दखल घेऊन तात्काळ तेथे फलक लावण्यात आला. माणुसकी टीमने महापालिकेने सुरू केलेले महापौर सेवा कक्ष यांचे धन्यवाद मानले.
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन