⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावमध्ये अजितदादाच्या राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

जळगावमध्ये अजितदादाच्या राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२४ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावात अजितदादाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार शिंदेसह २० पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याकडे राजीनामा दिला.शहरातील कार्यकर्त्यांसाठी प्रत्येक सोमवारी निश्चित करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आतापर्यंत एकाही सोमवारी वेळ दिला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकणे व सोडवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे.

महानगर जिल्हाध्यक्ष सुशिलकुमार शिंदे हे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार गटातून अजित पवार गटात दाखल झाले होते. परंतु पक्षाचे जिल्ह्यातील नेते तथा मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्याला वेळ दिला नाही अशी खंत व्यक्त केली आहे. प्रत्येक सोमवारी जळगावच्या कार्यकत्यांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा झाली पण एकही सोमवारी वेळ दिला नाही. दोन कार्यकर्त्यांना न विचारताच जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांनी परस्पर नियुक्ती दिली. त्यामुळे युवक महानगर जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणीतील २० पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यात तीन उपाध्यक्ष, तीन सरचिटणीस, चिटणीस, संघटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख यांचा समावेश आहे.

शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता बळावली
गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांत खदखद सुरू होती. कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. नेतृत्वाकडून समस्या सोडवणे तर दूर पण ऐकले जात नसल्याची ओरड आहे. त्यातून शह पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.