गोलाणी मार्केटमधून दुचाकी झाली चोरी

सप्टेंबर 10, 2021 6:45 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२१ ।  अर्जून वासूदेव जाधव हे रेणूका नगर मेहरूण येतील रहिवासी ८ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने गोलाणी मार्केटमध्ये आले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने लांबवाली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

अर्जून वासूदेव जाधव हे रेणूका नगर मेहरूण येतील रहिवासी ८ सप्टेंबर रोजी कामाच्या निमित्ताने गोलाणी मार्केटमध्ये दुचाकी (एमएच १९ डीएच ३३६१) ने दुपारी ४ वाजता आले. त्यांनी दुचाकी दत्तमंदीराच्या पुढे पार्किंग करून गेले. दरम्यान रात्री ९ वाजता दुचाकी जवळ आले असता त्यांना दुचाकी दिसून आली आहे. परिसरातही शोधाशोध केली दुचाकी न मिळाल्याने अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी अर्जून जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now