जळगाव जिल्हाजळगाव शहरमहाराष्ट्रराजकारण

कर्नाटकामध्ये नवीन पर्वाची सुरुवात – डॉ. उल्हास पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। कर्नाटकामध्ये विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहिर झाला. यात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक विजय प्राप्त केला. त्याबद्दल सर्वप्रथम तमाम कर्नाटक जनतेचे आभार मानतो व नतमस्तक होतो. तसेच आदरणीय सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहूल गांधी यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे, डी के शिवकुमार अणि सिद्धरमय्या यांच मी अभिनंदन करतो असे महाराष्ट्र राज्य, प्रदेश काँग्रेस कमिटीचे. उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले.

यावेळी ते म्हणाले कि, अनेक वर्षांपासून काँग्रेसचा विजय थोडक्यात हुकत होता, मागील वेळेसही कर्नाटकात काँग्रेसच सरकार होत मात्र विरोधी पक्षाने वेगवेगळ्या पदधतीने प्रलोभने देवून सरकार घालवल होत. यामुळे जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला होता. कनार्टकातील विजयामुळे आता बीजेपीसाठी दक्षिणेचे द्वार बंद झाले आहेत.

आगामी निवडणूकांमध्ये ही लाट आता संपूर्ण भारत देशात पसरेल. राहूल गांधींचा भारत जोडोचा संदेश जनेतने स्विकारला आहे. कर्नाटकाच्या जनतेचे पुनश्च अभिनंदन करुन ही नविन पर्वाची सुरुवात आहे. यापुढेही काँग्रेस पक्षाचे विचार मान्य होतील अशी अपेक्षा व्यक्‍त करतो.

Related Articles

Back to top button